Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘या’ कारणामुळं झाली वाळू व्यावसायिक संतोष जगतापची ‘गेम’, गोळ्या झाडून केला ‘खात्मा’

‘या’ कारणामुळं झाली वाळू व्यावसायिक संतोष जगतापची ‘गेम’, गोळ्या झाडून केला ‘खात्मा’
, सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (15:20 IST)
दौंड (Daund) तालुक्यातील राहू (Rahu) येथील दुहेरी खून प्रकरणातील आरोपी संतोष संपतराव जगताप  याचा उरुळी कांचन येथे गोळ्या झाडून खून करण्यात आला. हॉटेल सोनाईमधून  बाहेर पडल्यानंतर दबा धरुन बसलेल्या आरोपींनी संतोष जगातप याच्यावर गोळ्या (Murder) झाडल्या. याप्रकरणात  गुन्हे शाखेच्या युनिट 6 (Unit 6) ने फरार झालेल्या दोन सराईत गुन्हेगारांना 30 तासाच्या आत अटक (Arrest) केली. फरार झालेले आरोपी पळसदेव येथील शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांना अटक  करण्यात आली. आर्थिक हितसंबंध , पूर्ववैमनस्य तसेच वाळू तस्करीच्या (Sand smuggling) वर्चस्ववादातून हा खून झाला असल्याची शक्यता असून या खूनामागे नेमका कोणाचा हात आहे याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी रविवारी सांगितली आहे.

पवन गोरख मिसाळ (वय-29), महादेव बाळासाहेब आदलिंगे  (वय-26 दोघेही रा. दत्तवाडी, उरुळी कांचन) अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. स्वागत खैरे व त्याच्या साथीदारांनी संतोष जगतापवर गोळ्या घालून त्याचा खून केला.तर खैरे हा जगतापच्या अंगरक्षकाने केलेल्या गोळीबारात ठार झाला.दोघांविरुद्धही लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संतोष जगताप याच्यावर एक दुहेरी हत्येबरोबर आणखी एक खुनाचा गुन्हा दाखल होता. या दोन्ही गुन्ह्यात तो जामिनावर (bail) बाहेर होता.पाठलाग करत असल्याचा संशय होता

संतोष जगताप याने शुक्रवारी (दि.22) केडगाव येथील एका दुकानाचे उद्घाटन केल्यानंतर तो त्याच्या गाडीतून दुपारी उरुळी कांचन  येथे येत होता.त्यावेळी आपला कोणीतरी पाठलाग करत असल्याचा संशय त्याला आला होता. याच दरम्यान जगताप आणि त्याचे साथिदार हॉटेल सोनाई येथे जेवणासाठी थांबले होते.हल्ला होण्याच्या भितीपोटी हॉटेलमध्ये न बसता तो टेरेसवर जेवण करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याने मुख्य शटर बंद  केले.हॉटेल बाहेर येताच फायरिंगसंतोष जगताप हॉटेल सोनईमधून जेवण करुन बाहेर आला. त्यानंतर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.यामध्ये गंभीर जखमी होऊन संतोषचा मृत्यू झाला. यावेळी दोन गटात झालेल्या फायरिंगमध्ये स्वागत खैरे या सराईत गुन्हेगाराचा देखील खून झाला.
तर जगतापचा बॉडिगार्ड शैलेंद्रसिंग रामबहाद्दूर सिंग गंभीर जखमी झाला.

 वर्चस्ववादातून ही घटना घडली असावी
संतोष जगताप याची स्वत:ची टोळी होती. 2011 मध्ये वाळु उपशाच्या कारणावरुन दौंड येथील सख्ख्या चुलत भावांचा खुन झाला होता.या गुन्ह्यात संतोष जगताप याच्यासह 35 जणांचा समावेश होता. तसेच 2016 मधील खुनाच्या (Pune Crime) घटनेत देखील संतोषचा सहभाग होता.ही घटना घडण्यामध्ये परस्पर विरोधी असलेले वाद, वाळू तस्करी, आर्थिक हितसंबंध तसेच वर्चस्ववाद यातून हा प्रकार घडल्याची शक्यताअतिरीक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे  यांनी व्यक्त केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्रकच्या धडकेनं टँकर पलटी, आगीचा उडाला भडका, 2 जणांचा मृत्यू