Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ही भटकती आत्मा कधीच पाठलाग सोडणार नाही, शरद पवार पीएम मोदींबद्दल अस का म्हणाले?

modi sharad
, मंगळवार, 11 जून 2024 (10:54 IST)
शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्या 'भटकती आत्मा' या टीकेवर मोठे प्रतिउत्तर दिले आहे. जेष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, ही भटकती पीएम मोदींना नेहमी अस्वस्थ करेल. 
 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या 'भटकती आत्मा' वाल्या टीकेवर प्रतिउत्तर दिले आहे. पवार म्हणाले की, ही भटकती आत्मा पीएम मोदीला नेहमी अस्वस्थ करीत राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान ज्या भाषेचा वापर केला होता, त्यामुळे त्यांच्या पदाची गरिमा कमी झाली. शरद पवार सोमवारी अहमदनगरमध्ये एनसीपीच्या 25 व्या स्थापन दिवस प्रसंगावर आयोजित रॅलीमध्ये ही गोष्ट बोलले. 
 
पवार म्हणालेत की, ''मोदीजींनी आपल्या एका निवडणूक भाषणामध्ये मला 'भटकती आत्मा' असे संबोधन दिले होते. मोदींनुसार 'आत्मा' नेहमीच असते आणि याकरिता 'आत्मा' त्यांना अस्वस्थ करीत राहील.'' 
 
शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधत प्रश्न विचारला की, त्यांच्या जवळ पंतप्रधानच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी पर्याप्त 'जनादेश' आहे का? सध्याचा संपलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप बहुमत प्राप्त करू शकली नाही. केंद्रामध्ये नवीन सरकार बनवण्यासाठी एनडीए युतीची मदत घ्यावी लागली. भाजपला निवडणुकीमध्ये 240 सीट मिळालेत एनडीए घटकांसोबत हा आकडा 293 पर्यंत पोहचला. 
 
तसेच पवार म्हणाले की, ''नरेंद्र मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. पण, शपथ घेण्यापूर्वी त्यांना देशाच्या जनतेचा जनादेश मिळाला का? देशाच्या जनतेने त्यांना याकरिता सहमती दिली का? भाजपाजवळ बहुमत न्हवते. त्यांना तेलगू देशम पार्टी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारची मदत घ्यावी लागली. यामुळे ते सरकार बनवू शकले.'' 
 
तसेच ते म्हणाले की, लोकांना वाटले की, राम मंदिर निर्माण राजनीतीमध्ये प्रासंगिक असेल पण भाजपचा उमेदवार अयोध्यामध्ये हरला. पवार म्हणाले की, ''जर मी उद्या अयोध्यामध्ये राम मंदिरात गेलो तर याचा वापर माझ्या राजनीतीसाठी करणार नाही. अयोध्या जनतेने मोदींना वाईट कामांनी ओळखले आणि भाजप उमेदवारची हार सुनिश्चित केली. 
 
  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पतीने Instagram चालवण्यापासून थांबवले तर दोन मुलांच्या आईने स्वतःचे जीवन संपवले