Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

दोन वाहनाच्या अपघातात तीन ठार

mumbai
, गुरूवार, 11 एप्रिल 2019 (17:10 IST)
मुंबई - नाशिक महामार्गावर असलेल्या आटगाव जवळ आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दोन वाहनाच्या अपघातात तीन ठार तर दोन गंभीर जखमी झाल्याची दुदैर्वी घटना घडली. सकाळी आठच्या सुमारास आयशर टेम्पो क्र एम एच ०४ बि डी ७३३५ हा नाशिकहून भरधाव वेगाने मुंबईच्या दिशेने जात होता. यावेळी एका वळणावर टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्‍याने टेम्पो महामार्गावरील दुभाजक तोडून मुंबई लेन वरून नाशिक लेनवर गेला. त्याच दरम्यान मुंबईहून नाशिककडे जाणारा कंटेनर क्र. एम एच ४६ पि बि ९५७१ हा समोरून येत असताना हा कंटेनर अचानक समोर आलेल्या टेम्पो वर आदळला. 
 
या भिषण अपघातात टेम्पो मधील प्रवाशी नवनाथ तुकाराम देवकर ,नांदगाव, (वय ३५) सुजाता भाऊ वाझे (वय २५) (रातांधळे, शहापुर ), मिनल अशोक वाझे (रातांधळे ,शहापुर) वय १७ हे टेम्पोतच चिरडले गेले, तर टेम्पो चालक अर्जुन भोसले (वय ४५) व सूरज धाराळ (वय १६) हे गंभीर जखमी झाले. आपघात एवढा भयाणक होता की टेम्पोला धडकलेला कंटेनर टेम्पोला ठोकून रेल्वे ट्रॅक लगत जाऊन पडला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

घ्या, विद्यार्थ्यांना अभ्यासच टेन्शन असतच