Publish Date: Sat, 10 Feb 2024 (11:32 IST)
Updated Date: Sat, 10 Feb 2024 (11:35 IST)
समृद्धी महामार्गावर कार ने कंटेनरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली आहे.
उभ्या कंटेनरला समृद्धी महामार्गावर भरधाव येणाऱ्या कार ने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात तिघांचा दुर्देवी मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.मयत तिघे जालना जिल्ह्यातील आहे.
सदर घटना समृद्धी महामार्गावर धोत्रे ग्राम पंचायतीच्या हद्दीत घडलाय आहे. या ठिकाणी एक नादुरुस्त कंटेनर उभा होता. शिर्डीच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कारच्या चालकाला उभ्या कंटेनरच्या अंदाज आला नाही आणि कार ने जोरदार धडक दिली . या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. राहुल राजभोज, उमेश उगले, आणि भाऊसाहेब पैठणे अशी मयतांची नावे आहेत. अपघाताची माहिती मिळतातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून पुढील तपास करत आहे.