Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ताडोबात वाघिणीची शिकार झाल्याची दाट शक्यता

ताडोबात वाघिणीची शिकार झाल्याची दाट शक्यता
, शनिवार, 5 डिसेंबर 2020 (10:35 IST)
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात तीन बछडे वाघिणीपासून दुरावल्यामुळे एका बछडय़ाचा अशक्तपणाने मृत्यू झाला, तर दोन बछडय़ांवर उपचार सुरू आहेत. या बछडय़ांपासून दुरावलेल्या वाघिणीचा मागील एका महिन्यापासून कसून शोध घेण्यात आला. मात्र, कुठेही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे वाघिणीची शिकार झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्रात ऑक्टोबर २०२० रोजी गस्तीदरम्यान क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना वाघिणीचे तीन बछडे अशक्त स्थितीत आढळले. त्यापैकी एक बछडा अत्यंत गंभीर असल्याने त्याला उपचाराकरिता चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्रात पाठवले. परंतु त्याचा मृत्यू झाला तर दोन बछडय़ांवर उपचार सुरू आहेत.
 
बछडय़ापासून दुरावलेल्या वाघिणीचा शोध मागील एका महिन्यापासून सुरू आहे. वाघिणीचा अधिवास क्षेत्र, बफर, कोअर, वनविकास महामंडळ तसेच संभावित क्षेत्रामध्ये शोध घेण्यात आला. मात्र, कुठेही थांगपत्ता लागलेला नाही. त्यामुळे या वाघिणीची शिकार झाल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंद्रपूरमधील कन्हाळ गाव अभयारण्य म्हणून घोषित