ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमध्ये विचित्र घटना घडली आहे. बेपत्ता झालेल्या पत्नीचा शोध घेत पती शेवटी मित्राच्या रुमवर पोहोचला. रुमवर पोहोचलेल्या आतमध्ये पत्नीसह मित्राचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला.
एका फ्लॅटमध्ये एक पुरूष व एका स्त्रिचा मृतदेह आढळून आला होता. दोघांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आले होते. पोलिसांनी महिलेची ओळख पटवली. जयंती शाह असं मृत महिलेच नाव आहे. जयंती शाह घरातून बेपत्ता होत्या. त्यांचे पती अजित यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. रुममध्ये आढळलेला दुसरा मृतदेह संदीप सक्सेना यांचा होता. सक्सेना अजित यांचे मित्र होते.
या घटनेमध्ये संदीप यांनी स्टोन ग्राईंडरच्या मदतीने स्वतःचा गळा चिरलेला होता. संदीपने आधी जयंती यांची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याचं प्राथमिक अंदाजावरून पोलिसांनी सांगितलं. सक्सेना व अजित अंबरनाथमधील एका कंपनीत काम करायचे. सक्सेना नियमितपणे अजितच्या घरी येत जात असे. त्यामुळे अजित यांच्या पत्नी जयंती यांचे सक्सेना यांच्यासोबत मित्रत्वाचे संबंध होते,” अशी पोलिसांनी सांगितलं. तर सक्सेना आणि आपली पत्नी जयंतीमध्ये शारीरिक संबध होते व आपण त्याला विरोध केला होता, अशी माहिती अजित यांनी पोलिसांना दिली आहे.