Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नरभक्षक वाघीण T1ला जेरबंद अथवा ठार मारण्याचे आदेश मिळाले

नरभक्षक वाघीण T1ला जेरबंद अथवा ठार मारण्याचे आदेश मिळाले
, शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018 (15:00 IST)
यवतमाळ  जिल्ह्याच्या राळेगाव मोहदा भागातील तथाकथित नरभक्षक वाघीण T1ला जेरबंद अथवा ठार मारण्याचे आदेश मिळाल्या नंतर आता वन विभागाची मोहीमेला वेग आला आहे या मोहीमेची आता मॉकड्रील करीत आज पासून सुरु झाली आहे. या नरभक्षक वाघिणी ला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने थेट जंगलात कॅम्प लावून तयारी सुरु केली आहे या वाघिणीने आतापर्यंत या भागातील 13 लोकांचे बळी घेतले असून आता तिला जेरबंद करावे अथवा ठार मारावे अशी मागणी या भागातील ग्रामस्थांची होती त्याबाबत नागपूर चे प्रधान मुख्य वन संरक्षक ( वन्यजीव )  यांनी या वाघिणीला  शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करून जेरबंद करा किंवा  ठार मारा असे आदेश दिले होते.
 
त्या आदेशा विरुद्ध वन्यजीव प्रेमींनी नागपूर खंडपीठ मध्ये याचिका दाखल केली मात्र ती याचिका कोर्ट ने खारीज केली त्यानंतर वन्यजीवप्रेमीनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली मात्र सुप्रीम कोर्ट ने सुद्धा याचिका खारीज करून नागरिकांच्या जीवितास धोका ठरत असलेल्या वाघिणीबाबत नागपूर प्रधान मुख्य संरक्षक यांचे आदेश कायम ठेवल्याने आता वन विभागाने या टी1 वाघिणीला जेरबंद करण्यासाठी मोहीम तेज केली आहे.
 
सध्या मध्य प्रदेश च्या कान्हा येथील दोन हत्ती येथे दाखल झाले आहे शिवाय पोलीस विभागाचे ५ शार्प शुटर, ७ पशुवैद्यकीय अधिकारी, वाघिणीला  बेशुद्ध करणारी गोंदिया जिल्ह्यातील तज्ञ टीम आणि 70 कर्मचाय ऱ्यांचा फौजफाटा येथे दाखल झाला आहे. हे सर्व जण वाघिणीला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करणार आहे .शिवाय या भागात एक खासगी नवाब नामक शार्प शुटर सुद्धा येथे आले आहे अशी माहिती आहे.
 
सध्या यासाठी या भागातील 15 गावातील गुराखी आणि शेतकऱ्यांना मोहीम सुरु असे पर्यंत दाट जंगलात एकटे जाणे टाळावे अश्या सूचना वन विभागाने दिल्या आहे विशेष म्हणजे या टी 1 नामक वाघिणीला दोन 9 महिन्याचे छावे आहेत त्यांना सुद्धा जेरबंद करुन या सर्वाना रेस्क्यू सेंटर येथे पाठविण्यात येणार आहे. अशीही माहिती आहे. आजही या वाघिणीची मोठी दहशत आहे त्यामुळे तिला लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी गावकरी करीत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकारमधील मंत्र्यांची दालने म्हणजे भ्रष्टाचाराचे अड्डे – धनंजय मुंडे