रायगड किल्ला चढताना दत्तात्रेय परिहार (38) या शिवप्रेमी पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. दत्तात्रेय परिहार हे चिखलीच्या अनुराधा इंग्रजी माध्यमिक शाळेचे उपमुख्याध्यापक होते. त्यांच्यासोबत दहा शिक्षक सोमवार आणि मंगळवार सुट्टी असल्याने रायगड पाहण्यासाठी आले होते.
महाड या ठिकाणी मुक्काम करुन ते मंगळवारी सकाळी रायगडकडे निघाले.सगळेजण पायी चढाई करत होते. त्याचवेळी परिहार यांना दम लागला. तरीही परिहार चालत राहिले. काही वेळाने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. परिहार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा धक्का आला.