नांदेड येथे मन हेलवणारी घटना घडली आहे. चुलत बहिणीच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या दोन सख्ख्या भावांचा लिंबगावजवळ अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
अपघातात संजय गव्हाणे, नारायण गव्हाणे दोघांचा मृत्यू झाला आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी ही दुर्देवी घटना घडल्याने परभणीतील कमळापूर गावात शोककळा पसरली आहे. यातील दोघे भाऊ संजय गव्हाणे आणि नारायण गव्हाणे हे चुलत बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी मोटारसायकलने निघाले होते. त्याचवेळी नांदेडमधील लिंबगाव या ठिकाणी एका काराने त्यांच्या मोटारसायकलला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
आपल्या देशात रक्षांबधन उत्साह पार पडले मात्र त्याच दिवशी गव्हाणे कुटुंबियांवर मात्र दुखाचा डोंगर कोसळला आहे. संजय गव्हाणे आणि नारायण गव्हाणे हे दोघेही परभणीतील कमळापूर गावातील रहिवाशी होते.