उध्दव-सोनिया-पवार परिक्व नेते

सोमवार, 16 डिसेंबर 2019 (11:57 IST)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांचबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे. उध्दव ठाकरे, सोनिया गांधी आणि शरद पवार हे परिपक्व आहेत. ते योग्य निर्णय घेतील, असे ते म्हणाले.
 
शिवसेनेने राहुल यांचविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र, उध्दव ठाकरे सरकारला कोणताही धोका नाही, असे स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले. तर वीर सावरकर यांचे नातू रंजीत सावरकर यांनी राहुल गांधी यांचविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केंद्राकडे केली आहे.
 
'रेप इन इंडिया' या वक्तव्यावरून भाजपने राहुल गांधी यच्यावर हल्लाबोल केला होता. राहुल यांनी मफी मागावी, अशी मागणी भाजपने केली होती. त्यावर माझे नाव राहुल सावरकर नाही, त्यामुळे  मी माफी  मागणार नाही, असा पवित्रा राहुल यांनी घेतला होता. त्यानंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले होते.
राहुल यच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारणही तापले आहे. महाआघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेने आक्षेप नोंदवला होता. राहुल गांधी यच्या वक्तव्याने इतिहास बदलणार नाही. त्यांनी  सावरकरांबद्दल वाचले पाहिजे, असे राऊत म्हणाले होते. राऊत यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. त्याचदरम्यान उध्दव सरकारला कोणताही धोका नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले होते. अजित पवार यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले.
 
दुसरीकडे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. जेव्हा मोठ्या व्यक्तींबाबत चर्चा होते, त्यावेळी प्रत्येक जण त्याच्याशी सहमत होईल, असे नाही. सावरकरांबाबत राहुल यांचे एक वेगळे मत आहे. गाय आपली माता नाही असं सावरकरही म्हणाले होते. पण भाजप म्हणते गाय आपली माता आहे. सावरकर यांचे विचार भाजप स्वीकारेल का? ते तसे करू शकत नाही, असे भुजबळ म्हणाले. तर राहुल यांच्या वक्तव्यावर सावरकर यांचे नातू रंजीत सावरकर यांनीही आक्षेप नोंदवला आहे. सावरकर यच्यांचबद्दल कुणीही अपमानास्पद शब्द वापरू नयेत. राहुल यांच्याविरोधात केंद्र सरकारने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख पीएमसीच्या खातेदारांचे मातोश्रीबाहेर आंदोलन, उद्धव ठाकरेंचं सहकार्याचं आश्वासन