Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडून तातडीने 23 कोटी रुपये मंजूर

किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडून तातडीने 23 कोटी रुपये मंजूर
, बुधवार, 19 फेब्रुवारी 2020 (16:48 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर जाऊन अभिवादन केलं. यावेळी बोलताना अजित पवारांनी  किल्ले शिवनेरीच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने 23 कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती दिली.
 
अजित पवार म्हणाले, “पहिल्यांदाच एवढा उत्साह शिवभक्तांचा दिसत आहे. तरुण वर्ग मोठ्या संख्येने उत्साहाने आले आहेत. खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य आले आहे असं लोकांना वाटत आहे.  इथे आल्यानंतर खासदार अमोल कोल्हे, तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी काही कामांची माहिती दिली. तातडीचे 23 कोटी रुपये आवश्यक असल्याचं सांगितलं. त्याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली असता, उद्धव ठाकरेंनीही तातडीने 23 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले”
 
“शिवनेरी किल्ल्याच्या विकासासाठी आजच्या आज 23 कोटी मंजूर केले. चार विभागांना विभागून 23 कोटी रुपये मंजूर केले आहेत. वन विभाग, पुरातन विभाग, पीडब्ल्यूडीला 23 कोटी रुपये पाहिजे, ते दिले जातील”, असं अजित पवारांनी सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोना व्हायरसवर लस विकसित