Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई बोट दुर्घटनेत प्राण वाचवणाऱ्या आरिफ बामणे यांचा उद्धव ठाकरें कडून गौरव

मुंबई बोट दुर्घटनेत प्राण वाचवणाऱ्या आरिफ बामणे यांचा उद्धव ठाकरें कडून गौरव
, मंगळवार, 24 डिसेंबर 2024 (16:21 IST)
मुंबई किनारपट्टीवर नीलकमल या नौदलाच्या स्पीडबोटला अपघात होऊन 13 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. अनेकांना वाचवण्यात यश मिळाले. अनेकांचा जीव वाचवणाऱ्या आरिफ बामणे यांचा शिवसेना यूबीटीचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी गौरव केला.  नीलकमल बोट दुर्घटनेत 35 प्रवाशांचे प्राण वाचवून शौर्य दाखविणाऱ्या आरिफ बामणे यांचा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
ट्विटरवरील एका पोस्टमध्ये पक्षाने लिहिले आहे की, “नीलकमल बोट दुर्घटनेत 35 प्रवाशांचे प्राण वाचवणारे शौर्य दाखवणारे आरिफ बामणे यांचा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, उपनेते आमदार मनोज जामसुतकर उपस्थित होते.
 गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा लेणीकडे जात असताना भारतीय नौदलाची नौका नीलकमल या प्रवासी बोटला धड्कून बोट पालटून अपघात घडला. 

या अपघातात एकूण 13 जण मृत्युमुखी झाले तर 101 जणांना वाचविण्यात यश आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली. या घटनेची पोलीस आणि भारतीय नौदल संयुक्तपणे चौकशी करतील.असे मुख्यमंत्री म्हणाले. 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पत्नीवर बॉसशी संबंध ठेवण्यासाठी दबाव; नकार दिल्यामुळे घटस्फोट