Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्धव ठाकरे LIVE : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद ,शिवसेना आणि हिंदुत्त्व हे जोडलेले शब्द आहेत'

uddhav thackare
, बुधवार, 22 जून 2022 (17:47 IST)
शिवसेनेचे वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच जनेतशी संवाद साधत आहेत.
 
उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या बंडावर, राज्यातील सरकारच्या स्थैर्यावर काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे.
 
उद्धव ठाकरेंच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे -
 
* आजच सकाळी माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे माझा आवाज असा झाला आहे.
* शिवसेना आणि हिंदुत्त्व हे जोडलेले शब्द आहेत, एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाही
* मला जे काही करायचं तेव्हा मी केलं. देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये आमची गणना झाली.
* मी काही वेगळे मुद्दे घेऊन आलो आहे.
मुख्यमंत्री भेटत नव्हते हे गेल्या काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली. नंतरचे दोन तीन महिने शक्य नव्हतं. त्यानंतर आता मी भेटायला सुरुवात केली
* शिवसेना हिंदुत्वापाासून दूर होऊ शकत नाही, कारण शिवसेनाप्रमुखांनी मंत्र दिला आहे की, हिंदुत्व आमचा श्वास आहे.
* विधानसभवनात हिंदुत्त्वावर बोलणारा मी एकटा आहे.
* शिवसेना कोणाची आहे, काही जण भासवतात की ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही. त्या वेळेला जे विचार होते आताही तेच विचार आहे.
* अडीच वर्षात जे मिळालंय, ते बाळासाहेबांच्या शिवसेनेनंच दिलंय.
* एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचे फोन येतायत, आम्हाला परत यायचंय, असं म्हणतायेत.
* शिवसेनेचे आमदार गायब झाले. काही सुरत ला गेले मग गुवाहाटी ला गेले. काल परवा जी विधान परिषदेची निवडणूक झाली तेव्हा मी हॉटेलमध्ये गेलो होतो.
* बाथरुमला गेलो तरी शंका. शंकेला गेलो तरी लघुशंका, म्हणजे शंका, ही लोकशाही मला आवडत नाही
* मला कोणताही अनुभव नव्हता. वेगळा मार्ग पत्करावा लागला. त्यानंतर जे घडलं, पवार साहेबांनी एक बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की उद्धव तुला जबाबदारी घ्यावी लागेल. मी त्यांना सांगितलं की, महापौर झालो नाही, मग मुख्यमंत्री कसा होणार?
* राजकीय वळणं कसेही घेऊ शकतात. पण त्या वळणाला एक अर्थ पाहिजे. राजकारण रडकुंडीचा घाट नको.
* काँग्रेस-राष्ट्रवादीनं विश्वास ठेवला, पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेन तर काय करायचं?

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बियाणं-खतांच्या किमतीत वाढ, डीएपी खतांची किंमत 350 रुपयांनी वाढली