Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांचा भाजपाला इशारा

मुलाखतीमधून उद्धव ठाकरे यांचा भाजपाला इशारा
, शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020 (08:29 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत सामनातून वाचकांच्या भेटीला आली आहे. तत्पूर्वी या मुलाखतीचे प्रोमो खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटरवरुन पोस्ट केले होते,  त्यामध्ये, उद्धव ठाकरेंनी भाजपाला चांगलाच इशारा दिलाय. तसेच, राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी जनता हेच या सरकारचा केंद्रबिंदू असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. शेती उद्योगासह राजकारणावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलंय. 
 
यात ठाकरेंनी मुलाखतीच्या तिसऱ्या भागात सीएए कायद्याचं समर्थन केलं आहे, मात्र एनआरसीचा फटका देशातील हिंदूंना बसेल, आदिवीसी नागरिकांनी कुठून आपलं नागरिकत्व सिद्ध करावं, कुठून त्यांनी दाखले आणावेत? असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. कोणतेही सरकार घटनेनुसारच चालते. मोदी घटनाबाह्य सरकार चालवत आहेत काय? अन्न, वस्त्र, निवारा हेच आमचं संविधान, असल्याचं त्यांनी म्हटलं. महाविकास आघाडीचं भवितव्य चांगलं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांना लवकरच दिल्लीत जाऊन भेटणार आहे. तर, शरद पवार हे सरकारचे मार्दर्शक आहेत, रिमोट कंट्रोल नाहीत, असा खुलासाही उद्धव ठाकरेंनी मुलाखतीच्या तिसऱ्या भागात केलाय

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्य सहकारी बँक घोटाळा, अजित पवार यांच्यासह ६९ जणांना दिलासा