Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची प्रकृती गंभीर

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची प्रकृती गंभीर
, शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021 (15:50 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्याला शुक्रवारी सकाळी येथील नागपूर मध्यवर्ती कारागृहातून मेडिकलमध्ये हलविण्यात आले. गवळीला कोरोनाची बाधा झाल्यामुळे चार दिवसांपासून त्याच्यावर कारागृहातील इस्पितळात उपचार सुरू होते. मात्र, त्याची प्रकृती जास्त बिघडल्यामुळे  त्याला शुक्रवारी सकाळी कडेकोट पोलीस बंदोबस्तात मेडिकलमध्ये नेण्यात आले. 
 
मागील दोन ते तीन दिवसापासून गवळीची प्रकृती खराब झाली होती. यासंदर्भात तुरुंग अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर गवळी व इतर कैद्यांची ‘कोरोना’ चाचणी करण्यात आली. त्यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. तुरुंग प्रशासनाने या सर्वांना वेगवेगळ्या बरॅकमध्ये ठेवले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निगराणीत उपचार सुरू आहेत. नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात २०१२ साली गवळीसह १० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज ठाकरे यांचा जबरा फॅन पाहिला का ?