Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

येत्या 16 नोव्हेंबर 'रोजी' वाघनखं मुंबईमध्ये येणार-सुधीर मुनगंटीवार

sudhir munguttiwar
, शनिवार, 9 सप्टेंबर 2023 (21:42 IST)
मुंबई : शिवरायांनी ज्या वाघनख्यांनी स्वराज्यावर आलेल्या अफजलखानाचा  कोथळा काढला आणि आदिलशाहीला हादरा दिला ती वाघनखं आता महाराष्ट्रात आणली जात आहे. येत्या 16 नोव्हेंबर रोजी ती वाघनखं मुंबईमध्ये आणण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  दिली. सुधीर मुनगंटीवार यांनी या संबंधित माहिती सोशल मीडियावरही शेअर केली आहे.
 
छत्रपती शिवाजी महाराजांची ही वाघनखं सध्या लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. ती परत आणण्यासाठी इंग्लंडसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यावर राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं की, देशाची आणि महाराष्ट्राची अस्मिता असणारी शिवरायांची ही वाघनखं महाराष्ट्रात परत आणण्यात येणार आहेत याचा आम्हाला आनंद आहे. सर्वांना ही वाघनखं पाहण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहेत. ही वाघनखं ज्या ठिकाणी ठेवण्यात येतील त्या ठिकाणी अफजलखानाच्या वधाचा प्रसंग उभारण्यात येईल.  
 
Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे :अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठीची अंतिम मुदत जाहीर