Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलींना जीवेठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार ; जामनेर तालुक्यातील धक्कादायक प्रकार

crime
, शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2023 (07:40 IST)
जळगाव : महिलांसह मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नसून दिवसेंदिवस या घटना समोर येत आहे. अशातच मुलींना जीवेठार मारण्याची धमकी देत २९ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जामनेर तालुक्यातून समोर आला आहे. याबाबत संशयित नराधमाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
 
नेमका काय आहे प्रकार?
२९ वर्षीय महिला आपल्या दोन मुली व परिवारासह जामनेर तालुक्यातील एका गावात वास्तव्याला असून ३० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता गावात राहणारा विक्की सुरेश पाटील (वय-२५) हा पिडीत महिलेच्या घरात घुसून तिच्या मुलींना जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.
 
हा प्रकार घडल्यानंतर सुरूवातीला कुणालाही सांगितला नाही. त्यानंतर बुधवारी १ नोव्हेंबर रोजी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून विक्की पाटील याच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी विक्की सुरेश पाटील याच्या विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच संशयित आरोपीला विक्की पाटील याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर काळे करीत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Jarange Patil quit his hunger strike सरकारला 2 जानेवारीपर्यंतची मुदत देत जरांगे पाटील यांनी सोडलं उपोषण