Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र बंदला भुसावळमधील वरणगावमध्ये हिंसेचे गालबोट

महाराष्ट्र बंदला भुसावळमधील वरणगावमध्ये हिंसेचे गालबोट
, सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (15:38 IST)
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भुसावळमधील वरणगावमध्ये हिंसेचे गालबोट लागले आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र पहायला मिळालं. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना केलेल्या हाणामारीमध्य अनेकजण जखमी झाले आहेत. दोन्ही बाजूकडील जखमी कार्यकर्त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
 
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे विकास आघाडीच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला होता या बंदला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शांततेत पाळण्याचे आवाहन करत होते. तर भारतीय जनता पार्टीचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे बंद पाळू नका असे आवाहन करत होते. दोन्हीकडून बंद संदर्भात शहरभरामध्ये वेगवेगळा प्रचार केला जात असतानाच दोन्ही बाजूकडील पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने हाणामारी झाली.
 
कार्यकर्त्यांमध्ये रस्त्यावरच तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही बाजूकडील अनेक कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दोन्ही बाजूने एकमेकांवर मारहाणीचे आरोप केले जात आहे. आम्ही शांततेमध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बंदला समर्थन द्या असं सांगत असताना भाजपाचे लोक तिथे आला आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने वाद झाल्याचं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. तर भाजपाचे शहराध्यक्ष सुनील महाडीक यांनी आम्ही व्यापाऱ्यांना दुकान बंद करु नका असं सांगत शहरामध्ये फिरत असताना अचानक जमावाने आमच्यावर हल्ला केल्याचा दावा केलाय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खाद्यतेलाच्या साठ्यावर निर्बंध, पण किमती कमी होण्यास वेळ लागेल, का ते जाणून घ्या