Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या

विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या
नागपूर , शनिवार, 11 डिसेंबर 2021 (12:35 IST)
वर्ध्याच्या सावंगी मेघे येथील सरस्वती मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात आणि नास्त्यात अळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. दररोज जेवणात अळ्या निघत असल्यानं विद्यार्थाना उपाशी राहावं लागतंय.
 
एक दिवसानंतर जेवणात अळ्या निघत असल्याने वसतिगृहातील विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झालाय. गेल्या एक महिन्यापासून हा प्रकार घडत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. मेस व्यवस्थापककडे तक्रार केल्यानंतरही कोणतीच कारवाई न झाल्याने विद्यार्थी संतप्त झालेत.
 
येथे शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहे 
या वसतिगृहात ANM,GNM,B.Sc आणि फार्मसीचे शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी आहेत. सावंगी मेघे येथील सरस्वती वसतिगृहात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी विदर्भातून येतात. 6,450 रुपये प्रति महिना जेवणाचा खर्च होतो. सोयी सुविधेच्या नावांवर विद्यार्थांना अळ्यांचे जेवण आणि नास्ता मिळत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये वसतिगृह प्रशासनाविरोधात चांगलाच रोष दिसून येतोय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Omicron Variantवर बूस्टर डोस अप्रभावी आहे! तिसरा डोस घेतलेल्या लोकांना Omicronचा संसर्ग झाला