Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुढचे तीन-चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा

पुढचे तीन-चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा
पुणे , मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (22:37 IST)
पुण्यात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. सकाळी सहापासून शहर आणि परिसरातल्या अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. गेले अनेक दिवस पुण्यात पावसाने दडी मारली होती. मात्र, आज सकाळपासूनच पाऊस बरसत असल्याने तापमानातही घट झाली आहे. पुण्याचा पारा सरासरी 22 अंशापर्यंत खाली आला आहे. पुण्यात आज दिवसभरात 17.3 मिमीपर्यंत पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.  
 
पुण्यात दिवसा 48 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. त्यात हवामानात आर्द्रतेचं प्रमाण हे 95 टक्क्यांपर्यंत आहे. दिवसभरात अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे तीन ते चार दिवस पुण्यात अशाचप्रकारे हवामानाचं स्वरूप असणार आहे.
 
राज्यात सर्वत्र जोरदार पावसाचा इशारा
मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील 3-4 तास पावसाचा जोर अधिक असेल असंही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

योगविद्येच्या प्रचारासाठी ‘प्राण ते प्रज्ञा’ हे पुस्तक मार्गदर्शक – शरद पवार