वाशिम जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाचा आता प्राथमिक आरोग्य केंद्रात RTPCR नमुन्यांना बुरशी लागल्याचा प्रकार उघड झाला आहे. जऊळका आणि शिरपूर आरोग्य केंद्रातला धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 24 फेब्रुवारीपासून घेण्यात आलेल्या 110 नमुन्यांना बुरशी लागली. एकूण 310 नमुने घेण्यात आले होते मात्र त्यापैकी बुरशीग्रस्त नमुने स्वीकारण्यास लॅबनं नकार दिला आहे.
नमुने घेतल्यानंतर योग्य खबरदारी न घेतल्यामुळे बुरशी लागल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना बसणार आहे. हे सर्व नमुने आता पुन्हा घ्यावे लागणार आहेत.