Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एनडीएमध्येच आहोत आणि पुढेही एनडीएमध्येच राहणार : जानकर

एनडीएमध्येच आहोत आणि पुढेही एनडीएमध्येच राहणार : जानकर
, बुधवार, 9 डिसेंबर 2020 (16:55 IST)
राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) अध्यक्ष महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. माझे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भांडण आहे. पण मी त्याचा फायदा दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे मी भाजपासोबतच राहणार असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. बारामतीत एका खासगी कार्यक्रमात महादेव जानकर आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. 
 
भाजपावर आपण नाराज असलो तरी कुठेही जाणार नाही. आपण सध्या एनडीएमध्येच आहोत आणि पुढेही एनडीएमध्येच राहणार आहे, असे महादेव जानकर यांनी सांगितले. तसेच, एखाद्या पक्षाचा पडता काळ असल्यावर आपण पळून जायचं नसतं असे सांगत माझे आणि देवेंद्र फडणवीसांचे भांडण सुरु आहे. पण, त्याचा फायदा आम्ही दुसऱ्याला होऊ देणार नाही. त्यामुळे आपण एनडीएमध्येच राहणार असल्याचे महादेव जानकर म्हणाले. 
 
याचबरोबर, धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी आपल्यापरीने प्रयत्न सुरुच असल्याचे महादेव जानकर यांनी सांगितले. याशिवाय, माझा जिल्हाध्यक्ष जेवढा प्रबळ आहे, तेवढा तो नाही, अशा शब्दात महादेव जानकर यांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनाही टोला लगावला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार