Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरेंच्या सभेला आम्ही येणार , भीम आर्मीचा इशारा

राज ठाकरेंच्या सभेला आम्ही येणार , भीम आर्मीचा इशारा
, शुक्रवार, 29 एप्रिल 2022 (15:35 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी 1 मे 2022 रोजी औरंगाबादमध्ये सभा घेणार असल्याचे जाहीर केलं. ही सभा औरंगाबादमधील सांस्कृतिक मंडळ मैदानावर होणार असल्याचे त्यांनी सांगितलं. मात्र, अजूनही पोलिसांकडून या सभेला परवानगी देण्यात आलेली नव्हती. अखेर ती मिळाली आहे.

राज  ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला परवानगी मिळाली आहे. या सभेसाठी काही अटी पोलिसांनी दिल्या आहेत. सभेसाठी या अटींचं पालन करावं लागणार आहे. अशा 16 अटी औरंगाबाद पोलिसांनी घातलेल्या आहेत.
 
सभेसाठी मुख्य अट म्हणजे, "सभेदरम्यान कोणत्याही प्रकारे वंश, जात, भाषा वर्ण प्रदेश, जन्मस्थान, धर्म इत्यादी किंवा ते पाळत असणाऱ्या प्रथा- परंपरा यावरुन कोणत्याही व्यक्ती व समुदायाचा अपमान होणार नाही, अगर त्याविरोधात चिथावणी दिली जाणार नाही अशी कृती वक्तव्य घोषणाबाजी कोणीही करणार नाही याची आयोजक व वक्त्यांनी काळजी घ्यावी." कार्यक्रमात कोणतेही शास्त्र बाळगू नये. असभ्य वर्तन करू नये, ध्वनी प्रदूषण होणार नाही, धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही, सामाजिक वातावरण बिघडणार नाही. सामाजिक सलोखा बिघ़डेल असं वर्तन होणार नाही याची खबरदारी सभेदरम्यान घ्यावी लागणार आहे.या सभेसाठी 15 हजार लोकांनाच बोलावता येईल, वाहतूक नियमांचे पालन करावे लागेल. आक्षेपार्ह घोषणा देता येणार नाही. शस्त्रं, स्फोटक पदार्थ आणता येणार नाहीत, त्यांचं प्रदर्शन करता येणार नाही असं पोलिसांनी दिलेल्या अटीत म्हटलं आहे.
राज ठाकरेंच्या औरंगाबादतील सभेला पोलिसांनी परवानगी दिल्यावर भीम आर्मी आक्रमक झाली आहे. राज हाकारे यांनी या अटींचं उल्लंघन केल्यास सभा बंद पडण्याचा इशारा भीम आर्मी कडून देण्यात  आला आहे.  या सभेला संपूर्ण भीम आर्मीचे कार्यकर्ते जाणार असल्याचं भीम आर्मीचे महासचिव अशोक कांबळे यांनी सांगितले आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राणा दाम्पत्याला दिलासा नाही, आजची रात्रसुद्धा तुरुंगातच जाणार