गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पाऊस परतणार असून महाराष्ट्र कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांसह विविध भागात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सध्या दक्षिण गुजरात ते कर्नाटक पट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. येत्या पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असून काही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील इतर भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस येणार
आज सिंधुदुर्ग, सातारा कोल्हापूर जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला असून या भागात मुसळधार पाऊस कोसळणार आहे. तर मुंबई, ठणारे, पुणे आणि पालघर आणि कोकण किनारपट्टी भागात जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तर हवामान खात्याकडून मराठवाडा, विदर्भातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तण्यात आली आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.