बीड मध्ये नदीच्या ओढ्यात वाहत चालेल्या एका मुलाचे प्राण एका तरुणीने वाचवले आहे.या धाडसी मुलीने प्रसंगावधान राखून हिमतीने आपल्या ओढणीचा दोर बनवून मुलाच्या दिशेने फेकला.या ओढणीरूपी दोर धरून तो मुलगा सुखरूप बाहेर आला.
ही घटना आहे बीड मधली.सध्या सर्वत्र पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहे.पावसाळी सहलीचा मोह नागरिकांकडून आवरला जात नाही.आणि लोक धबधबे,नदीपात्रात सहलीसाठी जातात आणि पाण्यात सेल्फी काढून आपला जीव धोक्यात टाकतात.अशीच घटना बीड मध्ये घडली. एक मुलगा आपल्या आई-वडिलांसह आद्यकवी मुकुंदराजस्वामी मंदिराच्या बुट्टेनाथ डोंगर परिसरात सहलीसाठी आलेला होता. वाण नदीपात्रात जाण्याचा मोह त्याला आवरता आला नाही .परंतु नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढला आणि हा मुलगा प्रवाहात अडकून बसला.आई वडिलांनी त्याला वाचविण्यासाठी आरडा-ओरडा करण्यास सुरवात केली.
सुलभा सोळंके नावाची ही तरुणी देखील आपल्या मैत्रिणींसह तिथे आली होती.तिने स्वतःचे जीव धोक्यात टाकून प्रसंगावधान राखून आपली आणि इतर मैत्रिणीच्या गळ्यातील ओढण्याकाढून त्याची दोर बनवून मुलाचा दिशेने टाकली.आणि इतर लोकांच्या मदतीने त्या मुलाला बाहेर काढण्यात यश आला आणि अशा प्रकारे मुलाचे प्राण वाचवले.सध्या या घटनेचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.आणि मुलाचे प्राण वाचवण्यासाठी या धाडसी मुलीचे सर्वत्र कौतुक होत आहे.