सध्या लग्नसराई सुरु आहे. लग्न म्हटलं की घरात आनंदच वातावरण असत. लग्नात नववधू आणि नवरदेव आपल्या सर्व हौशी पूर्ण करतात. कौंडगाव तालुका पाथर्डी येथे एक आगळ्या वेगळ्या लग्नाचे चर्चे होत आहे.
कौडगाव ( आठरे ) ता. पाथर्डी या ठिकाणी बडेकर वस्तीत लग्न मंडप होत वाजंत्री होते. गोंगाट सुरु होता घरात लग्न सोहळा होता. पण वधू वर होते 70 वर्षाच्या पुढे. . रोहिदास धुराजी बडेकर (72) वर्षाच्या मुलांनी आपल्या आईवडिलांचा लग्नाचा वाढदिवशी त्यांचं पुन्हा लग्न लावण्याचे योजिले.
रोहिदास हे मुंबई महानगरपालिकेत कामाला असून त्यांचं लग्न 6 मे 1973 रोजी नगर तालुक्यातील परीगा नेताजी ठोंबे यांच्याशी झाला. त्यांना तीन अपत्ये आहेत. तिन्ही मुलांना त्यांनी लहानच मोठं केलं. त्यांना उच्च शिक्षण देऊन मुंबईत नोकरीला लावलं. आईवडिलांचे आपल्या वर खूप उपकार आहे. त्यांच्यामुळे आपण सुव्यवस्थित आहोत ही जाणीव मुलांना होती म्हणून त्यांनी आपल्या आई वडिलांचा लग्नाचा 50 वा वाढदिवस दणक्यात करण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे त्यांनी सर्व नातेवाईकांना बोलवून आपल्या आईवडिलांचा लग्नाचा 50 व्या वाढदिवशी पुन्हा लग्न लावले. त्यांच्या या लग्नाची चर्चा परिसरात चांगलीच रंगली आहे.