गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाण प्रकरणी अटक आणि सुटका झाली आहे.
"जितेंद्र आव्हाड यांना ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली होती, त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं, कोर्टानं आता त्यांना जामीन मंजूर केला आहे," ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांनी बीबीसी मराठीला ही माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवे लावण्याच्या आव्हानावर आव्हाड यांनी टीका केली होती. त्यानंतर अनंत करमुसे यांनी आव्हाड यांना एका अक्षेपार्ह फेसबुक पोस्टमध्ये टॅग केलं होतं.
त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील अनंत करमुसे यांनी केला होता. त्यानंतर ठाणे भाजपने या प्रकरणी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती.
जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी घरातून उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. मारहाण झाली तेव्हा यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असा करमुसे यांचा दावा आहे.