Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय सांगता,जन्मदात्यांना काठीने बेदम मारहाण केली

काय सांगता,जन्मदात्यांना काठीने बेदम मारहाण केली
, रविवार, 20 जून 2021 (14:47 IST)
आज आपल्या वडिलांच्या सन्मानाचे दिवस असताना माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडलेली आहे.आपल्या जन्मदात्याचा सन्मान करणं सोडून जीवदात्यांना काठीने मारहाण केल्याचे वृत्त समोर आले आहे.
 
ही संतापजनक घटना बीड मधील शिरूर इथली आहे.येथे एक मुलगा  चक्क आपल्या आई-वडिलांना काठीने बेदम मारतांनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.या मारहाणीत आईचा मृत्यू झाला असून वडील अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.या घटने ची सर्वत्र चर्चा होत असून खळबळ उडाली आहे.
 
बीडमधील या विकृत मानसिकतेच्या व्यक्तीने शनिवारी संध्याकाळी आपल्या आई-वडिलांना काठीने मारहाण करायला सुरुवात केली.या घटनेचा व्हिडीओ त्या गावातील एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये घेतला असून तो व्हायरल झाला आहे. 
 
लोकांनी त्याला मारहाण करताना थांबविण्याचा प्रयत्न केला असून त्याने लोकांना शिव्या देऊन मारहाण करत होता.लोकांनी असे सांगितले की तो सतत आपल्या आई-वडिलांना मारहाण करायचा .या मारहाण प्रकरणात त्याची आई हिचा मृत्यू झाला आहे तर वडील गंभीररीत्या जखमी झाले असून नगरच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.अद्याप त्या इसमावर कोणतीही कारवाई केली नाही.
 
या संदर्भात बीड चे पोलीस अधीक्षक म्हणाले की व्हायरल झालेल्या व्हिडिओची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पेट्रोल-डिझेल पुन्हा महागलं!