Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Tuesday, 29 April 2025
webdunia

कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र राज्यात कधी येणार?

Karnataka
नागपूर , शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (11:45 IST)
विधानसभेच्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात भाजपला धारेवर धरले. उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकार देशात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करुन इतर देशातील हिंदूंसाठी इथले दरवाजे उघडत आहे. त्याला आमचा विरोध नाही. काश्मिीरी हिंदू पहिल्यांदा  भारतात आले तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना आसरा दिला होता.
 
परंतु इतर देशातले जे हिंदू भारतात येतील, त्यांची काळजी कोण वाहणार आहे? भाजप जसा इतर देशातल्या 
हिंदूंचा विचार करत आहे. तसा बेळगावातल्या हिंदूंचा विचार करणार का? असे अनेक सवाल उद्धव ठाकरे
यांनी उपस्थित केले. 
 
उद्धव ठाकरे म्हणाले की, बेळगाव, कारवार, निपाणीसह इतर भागातील हिंदूंच्या प्रश्नांचे काय? बेळगावातले
लोक हिंदू नाहीत का? बेळगावातले मराठी बांधव आक्रोश करत आहेत. त्यांना महाराष्ट्रात यायचे आहे. हा प्रश्न कधी सुटणार. कर्नाटकात भाजपचे सरकार आहे.
 
कर्नाटकचे मुख्यमं‍त्री भाजप नेते येडियुरप्पा यांनी नुकतेच तिथे बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे भाजपने
पुढाकार घेऊन बेळगाव प्रश्न सोडवावा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भैरवनाथ शुगरकडून उसाला 2511 रुपे प्रतिटन दर जाहीर