नागपुरात एका महिलेने पतीचे दुष्कृत्य उघडकीस आणून त्याला तुरुंगात पाठवण्याची घटना घडली आहे.
आरोपी पती महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांचे शोषण करायचा त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळायचा तसेच तो आपल्या पत्नीला अनेकदा त्रास द्यायचा.आरोपी पतीच्या विरुद्ध पत्नीने पुरावे एकत्र करून त्याला तुरुंगात पाठविले. आरोपीचे लग्न 2021 मध्ये झाले असून त्याला तीन वर्षाची मुलगी आहे.
आरोपी लग्न झालेले नाही से सांगून महिलांना आणि मुलींना प्रेमात अडकवायचा आणि त्यांना लग्नाचे खोटे आमिष दाखवून त्यांच्याशी संबंध स्थापित करायचा या काळात तो आक्षेपार्ह व्हिडीओ बनवायचा नंतर ते व्हायरल करण्याची धमकी येत त्यांना ब्लॅकमेल करायचा नंतर त्यांच्याकडून पैसे उकळायचा.
आरोपीच्या पत्नीला त्याच्यावर संशय आला आणि तिने एका नातेवाइकच्या मदतीने पतीचा फोन क्लोन केला आणि व्हॉट्सअॅप हॅक केले.व्हॉट्सअॅप तपासल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली. व्हॉट्सअॅप वरून तिच्या पतीचे अनेक महिलांशी संबंध असल्याचे तिला समजले. या मध्ये अनेक अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. महिलांचे आणि मुलींचे आक्षेपार्ह व्हिडीओ आणि छायाचित्र होते आणि या द्वारे तो महिलांना आणि मुलींना ब्लॅकमेल करायचा.
तिने पीडित महिलांशी आणि मुलींशी संपर्क करण्यात यश मिळवले. आणि त्यांना आरोपीच्या विरोधात तक्रार करण्यास भाग पडले. तिने पीडित महिलांना आणि मुलींना आरोपीच्या विरोधात तक्रार नोंदवण्यासाठी विनंती केली. नंतर एका मुलीने पुढाकार घेऊन आरोपीच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.