Publish Date: Tue, 20 Dec 2016 (15:41 IST)
Updated Date: Tue, 20 Dec 2016 (15:42 IST)
येत्या वर्षभरात राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व बसमध्ये वायफाय सुविधा देण्यात येणार आहे. जानेवारीपासून वायफाय बसवण्याचे काम सुरु होणार असून राज्यभरातील जवळपास 18 हजार बसमध्ये प्रवाशांना वायफाय सेवा मिळणार आहे. एसटीने वायफायसाठी एका कंपनीशी करार केला असून हा करार पाच वर्षांसाठी असेल. वायफाय सेवेसाठी प्रतीवर्ष महामंडळ एक कोटी रुपये मोजणार आहे.