Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सीमाप्रश्नी अमित शहांशी चर्चा करणार : फडणवीस

devendra fadnavis
, बुधवार, 7 डिसेंबर 2022 (09:47 IST)
गेल्या काही दिवसांपासून सीमाप्रश्नी दावे- प्रतिदावे सुरू असताना मंगळवारी दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला. महाराष्ट्रातून आलेल्या ट्रकसह पाच वाहनांवर दगडफेक केल्याचे वृत्त पसरल्यानंतर तीव्र पडसाद उमटले. सीमावर्ती भागातून दोन्ही राज्यांनी बस वाहतूक बंद केली. सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोम्माई यांच्याशी चर्चा करत या घटनेचा तीव्र निषेध केला. तसेच सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याचे जाहीर केले. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत कर्नाटकने हल्ले न थांबवल्यास बेळगावला धडक देण्याचा इशारा दिला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावत एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच बोम्माई यांच्याशी संपर्क साधून शांतता व समन्वय राखण्याबाबत आवाहन केले आहे.
 
शहांना देणार संपूर्ण माहिती
महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाप्रश्नी संपूर्ण स्थिती पेंद्रीय गफहमंत्री अमित शाह यांना आपण सांगणार आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली. मंगळवारी बेळगावमध्ये घडलेल्या घटनांच्या संदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याशी आपण दूरध्वनीवर लगेचच चर्चा केली आणि या घटनांबद्दल त्यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. या घटनांसंदर्भात तात्काळ कारवाई करण्याचे आणि अशा घटना घडविणाऱयांना सरकार पाठीशी घालणार नाही, असे सांगून त्यांनी मला आश्वस्त केले आहे. संपूर्ण घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही फडणवीस म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रणजी स्पर्धेत पहिल्यांदाच महिला पंच