Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑक्सिजन पुरवठयासाठी ग्रीन कॉरिडोर करणार

ऑक्सिजन पुरवठयासाठी ग्रीन कॉरिडोर करणार
, सोमवार, 19 एप्रिल 2021 (16:11 IST)
महाराष्ट्रातील अंतर्गत भागात विना अडथळा ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी ग्रीन कॉरिडोर केला जाईल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. याशिवाय, ऑक्सिजन टँकर आणण्यासाठी ड्रायव्हर कमी पडत असल्यामुळे एसटी चालकांना ऑक्सिजन टँकर चालवण्यासाठी तयार करत आहोत, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
 
केंद्र सरकारने बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकारला परवानगी दिली आहे. त्यामुळे सरकारने ऑक्सिजन आणण्यासाठी टँकर पाठवले आहेत. राज्यात ऑक्सिजनचे टँकर आल्यानंतर अत्यावश्यक ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करताना ग्रीन कॉरिडोर केला जाईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
 
एसटी चालकांना ऑक्सिजन टँकर चालवणार
ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी सरकारला ड्रायव्हर कमी पडत आहेत. त्यामुळे आता एसटीचे ड्रायव्हर हे ऑक्सिजन टँकर चालवणार आहेत. अनिल परब यांनी तशी माहिती दिली आहे. राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्याचं कोऑर्डिनेशन परिवहन विभाग करत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे काही टँकर्सचे ड्रायव्हर्स गावाला निघून गेले आहेत. त्यामुळे ड्रायव्हर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही परिवहन विभागाचे ड्रायव्हर्स आम्ही ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत, असं परब यांनी सांगितलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लवकरच कडक लॉकडाउन! दोन दिवसांत मुख्यमंत्री घेणार निर्णय