आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस यांनी हे आरोप फेटाळून लावल्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्य सरकार तसंच शिवसेनेवर टीका केली आहे.
1993 बॉम्ब ब्लास्टमधील आरोपींच्या मित्रांशी मुख्यमंत्री मांडीला मांडी लावून बसले आहेत. सत्तेसाठी अंडरवर्ल्डची मदत घेणारे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.