Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरगुती भांडणातून नवऱ्याच्या कंपनीत बाँबस्फोट करण्याची धमकी, महिलेला अटक

arrest
, शुक्रवार, 16 जून 2023 (17:15 IST)
मानसी देशपांडे
 
 पुणे शहरातील चंदननगर भागातून एक विचित्र घटना समोर आली.
 
नवऱ्याशी होत असलेल्या वादातून एका 33 वर्षीय महिलेने त्याच्या इमेल आयडीवरुन तो काम करत असलेल्या आयटी कंपनीला इमेल पाठवून धमकी दिली.
 
त्यामध्ये कंपनी तसेच कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करत असलेली कॅब सर्व्हिस बाँबने उडवून देण्याची धमकी दिली.
 
रविवार, 11 जून 2023 रोजी हा प्रकार घडला. पोलिसांच्या तपासाअंती हा प्रकार समोर आला.
 
नेमका प्रकार काय?
चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीमधली खराडी भागातल्या एका आयटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना रविवारी एक मेल आला. त्यामध्ये या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या कॅब्स शक्तिशाली बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती.
 
त्यानंतर संध्याकाळी परत एक इमेल आला. त्यामध्येही धमकी होती आणि तसंच कंपनीमधल्या महिला कर्मचाऱ्यांचं अपहरण करण्याचा उल्लेख होता.
 
अशाप्रकारचे इमेल आल्यानंतर कंपनीकडून चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. तक्रार प्राप्त झाल्यावर पोलिसांनी बाँबशोधक पथकासह कंपनीचा परिसर, पार्किंग, आणि सगळ्या मजल्यांची तपासणी केली. परंतू कुठेही संशयास्पद वस्तू आढळली नाही.
 
यानंतर पोलिसांनी मेल करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला.
 
ज्या ईमेलआयडीवरुन धमकीचा मेल आला होता, त्या इसमाला कोंढवा परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केल्यावर वेगळंच तथ्य समोर आलं.
 
पतीवरच्या रागावरुन पत्नीनेच केला मेल
या इसमाची दोन लग्नं झाली होते. यामुळे त्याचे पहिल्या पत्नी सोबत सातत्याने वाद होत होते.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या इसमावर पहिल्या पत्नीने ट्रिपल तलाक देण्याचाही आरोप केला होता व त्यासंदर्भात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल केला होता.
Published By -Smita Joshi

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबई शहरात पाण्याचे संकट, आता फक्त इतक्या दिवसाचे पाणी शिल्लक