rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना सूचना

Yashwantrao Chavan Maharashtra Open University
, बुधवार, 20 मार्च 2024 (09:29 IST)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या उन्हाळी सत्र परीक्षा विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार, दि. 24 मे 2024 पासून ऑफलाईन पद्धतीने (विवरणात्मक - Descriptive) महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित केल्या  जाणार आहेत. 
 
या परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी (Repeater) विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज (Repeater Form) भरण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली असून, त्याबाबतचे सूचनापत्र विद्यापीठ पोर्टलवर प्रसिद्ध केलेले आहे. विद्यापीठाचे पोर्टल: https://ycmou.digitaluniversity.ac/ Click Tab : Examination Tab - May 2024.
 
तसेच या परीक्षेचे वेळापत्रक व सूचनापत्र यथावकाश पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येतील.  सर्व संबंधित अभ्यासकेंद्रांनी व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी, परीक्षा आयोजन विषयक सर्व बाबींकरीता विद्यापीठ पोर्टलला वेळोवेळी भेट देवून माहिती पहावी. अशी माहीती परीक्षा नियंत्रक भटूप्रसाद पाटील यांनी दिली.

Edited By -Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जळगावात दहशत माजविणारा गुन्हेगाराला अटक