Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

छतावर चढलेल्या वळूची 50 तासा नंतर सुखरूप सुटका

छतावर चढलेल्या वळूची 50 तासा नंतर सुखरूप सुटका
, मंगळवार, 7 ऑगस्ट 2018 (15:33 IST)
अतुल कुलकर्णी अभिनित वळू चित्रपट खूप गाजला आहे. यामध्ये गावातील वळू मुळे नागरिक कसे भयभीत होतात हे दाखवले असून वळूचे सुंदर चित्रीकरण करण्यात आले आहे. असाच काहीसा प्रकार यवतमाळ येथे घडला असून एका वळूच्या चुकीमुळे तो अडचणीत सापडला मात्र त्याला वाचवले आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा तालुक्यातील महागांव कसबा येथील गणेश राठोड यांच्या घराच्या स्लॅबवर रात्री वळू (सांड) चढल्याने एकच खळबळ उडाली होती आज या वळूला काढण्यात यश आले आहे. एक तासाच्या प्रयन्त नंतर क्रेन च्या साहाय्याने त्या वळू ला काढण्यात गावकऱ्यांना यश आले आहे.
 
महागांव येथील शेतकरी गणेश राठोड यांचे तांड्यात घर आहे. सकाळी शेतात जायला निघत असतांना घराच्या स्लॅबवर सांड (वळू) आढळला. पाहता पाहता ही बातमी साऱ्या गावभर पसरली. छ्तावर चढलेला (वळू) सांड पाहण्यासाठी गावकरी उत्सुक होतेसर्वांची पावले राठोड यांच्या घराकडे वळली. त्याला पाहून सारेच अवाक झाले.तो रात्री घराच्या छतावर चढला. चाऱ्याची (लालुस) प्रलोभन दाखवून त्याला खाली उतवरविण्याचा प्रयत्न केला. मात्र सगळे प्रयत्न व्यर्थ ठरले.त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली.वळू (सांड) छतावर अडकून पडल्याने राठोड कुटुंब काळजीत पडले त्याला कसे काढावे असा ग्रामस्थांसमोर मोठा प्रश्न पडला. सांड छतावरच ठिय्या देवून बसलेला असल्याने.ग्रामस्थांनी फोनवरून पोलीसांना याची माहिती कळविली. त्या वळूला खाली सुरक्षित कसे काढता येईल यावर खल काल दिवसभर सुरू होते आज त्या वळूला काढण्यात यश आले असून एका क्रेन च्या साहाय्याने त्याला खाली काढण्यात आले यावेळी मोठी गर्दी गावकऱ्यांनी केली होती. हा वळू 50 तास घराच्या छताच्या अडकून पडला होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या वळणावर......