भाषण शैलीवरून आणि प्रामाणिकपणावरून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे खरोखर वारसदार आहात.तुमच्या हातात महाराष्ट्राची सत्ता गेल्यास महाराष्ट्रात काही दणकेबाज घडेल असे गौरवोद्गार डॉ. जयसिंगराव पवार यांनी काढत भविष्यात ठाकरे यांचा सत्कार करण्याचा योग येऊ दे अशी अशा व्यक्त केली.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या घरी भेट दिली.डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्याशी जवळपास अर्धा तास विविध मुद्द्यांवर चर्चा केली.छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य ऐतिहासिक बाबींवर चर्चा करत त्याने चित्रपटात सुरू असलेल्या इतिहासाबाबत देखील चर्चा केल्याची माहिती देण्यात आली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, इतिहासा संदर्भात काही शंका त्यांच्या मनात होत्या.त्यामुळे त्यांना असं वाटले की माझ्याशी चर्चा करावी. ऐतिहासिक चित्रपट आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कलाकृती तयार करत असताना त्या भरकटच जातात. ठाकरे यांना इतिहासाबद्दल आस्था आहे. त्यानिमित्ताने आज राज ठाकरे यांनी माझ्या घरी येऊन चर्चा केली त्यांना इतिहास जाणून घेण्याची फार इच्छा आहे.त्या संदर्भातच मार्गदर्शन करण्याची इच्छा राज ठाकरे यांनी माझ्याकडे व्यक्त केली.असेही जयसिंगराव पवार यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, काही वेळा चित्रपट तयार करत असताना कथा रंगवावी लागते.या संदर्भात देखील चर्चा केली.मात्र कथा रंगवत असताना इतिहासाची मोडतोड होऊ नये,इतिहासाच्या त्या कलाकृतीला बाधा पोहोचू नये,याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.ही गोष्ट ठाकरे यांनी मान्य केली असल्याचे पवार यांनी सांगितले.
करवीर संस्थापिका रणरागिणी ताराराणी यांच्या इतिहासाबद्दल जाणून घेताना ठाकरे यांनी आश्चर्य व्यक्त केले.इतक्या मोठ्या पराक्रमी स्त्री असून देखील महाराष्ट्राला त्याची कल्पना नाही.असेही त्यांनी बोलून दाखवलं असल्याचं पवार यांनी सांगितले. पवार यांनी ठाकरे यांना एक वेळ माझ्यावर बोलू नका पण रणरागिणी ताराराणी यांच्यावर बोला,राजकीय नेते जोपर्यंत अशा पराक्रमी स्त्री विषयी बोलत नाहीत, तोपर्यंत त्यांचा इतिहास माहिती करून घेत नाहीत असा दाखलाही पवार यांनी दिला.
Edited By- Ratnadeep Ranshoor