अमर अनंत अग्रवाल असं संबंधित तरुणाचं नाव असून तो बीड येथील रहिवासी आहे. पण एका फसवणुकीच्या प्रकरणात संबंधित तरुण 2018 पासून मध्य प्रदेशातील भैरवगड कारागृहात शिक्षा भोगत आहे. संबंधित तरुण हॅकर असल्याने तुरुंगातील अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर जबरदस्ती करत, हे काम करायला भाग पाडल्याचा दावा आरोपी तरुणानं पोलीस चौकशीत केला आहे.
यासाठी तुरुंगातील अधिकाऱ्यांनी आरोपी तरुणाला काही क्रेडिट कार्ड्स आणि लॅपटॉप उपलब्ध करून दिला होता. याच्या अधारे आरोपीनं तुरुंगात बसून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. आरोपीनं परदेशातील लोकांची बँक खाती हॅक करून त्यातील रकमेची आफरातफर केली आहे.