पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राला कुणाल राऊत यांनी काळे फासल्याच्या प्रकरणीगुन्हा दाखल करत माजी मंत्री नितीन राऊत यांचा मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.
नागपुरात मोदी सरकारचे 'विकसित भारत' या जाहिरातीवर कुणाल राऊत यांनी काळ फासलं तसेच त्यांनी नागरिकांच्या पैशातून स्वतःची जाहिरात करण्याचा आरोप देखील मोदी सरकारवर केला आहे. त्यांच्या समवेत त्यांच्या काही सहकाऱ्यांनी शनिवारी जिल्हा परिषदेत मोदी की गॅरंटी या आशयाच्या जाहिरातीच्या बॅनर वर काळं फासल्या प्रकरणात नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांना पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांना पोलिसांनी या प्रकरणात नोटीस बजावली होती. तसेच त्यांना चौकशी साठी बोलावले असताना ते हजर झाले नाही. नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईवर काँग्रेस कडून सरकारची टीका केली जात आहे.