Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुण्यात झिका व्हायरसचा रुग्ण सापडला

पुण्यात झिका व्हायरसचा रुग्ण सापडला
, शुक्रवार, 2 डिसेंबर 2022 (21:32 IST)
पुणे  शहरात झिका व्हायरसचा  रुग्ण आढळून आला आहे. 18 नोव्हेंबरला 67 वर्षांच्या एका व्यक्तीत याची लक्षणं दिसून आली. पुणे जिल्ह्यातील बावधन इथं हा रुग्ण आढळला. 16 नोव्हेंबरला हा रुग्ण पुण्यातील जहांगीर रुग्णालयात ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा या कारणांसाठी वैद्यकीय सल्ल्यासाठी आला होता. त्याच्या रक्ताचे नमुने खासजी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असात हा रुग्ण झिका बाधीत असल्याचे समजले. 
 
ज्या व्यक्तित झिका व्हायरसची लक्षण आढळली त्याच्या घरांतील इतर सदस्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून एकही संशयित रुग्ण आढळलेला नाही. या भागातही घरोघरी सर्वेक्षण करण्यात आले असून त्या भागात एडीस डास उत्पत्ती आढळलेली नाही तसंच या भागात धूरफवारणीही करण्यात आली आहे. रुग्ण हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील असून 6 नोव्हेंबरला तो पुण्यात आला होता. त्याआधी तो 22 ऑक्टोबरमध्ये सूरत इथं गेला होता. दरम्यान या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि बावधन परिसरातील ताप रुग्ण सर्वेक्षण आणि कीटक शास्त्रीय सर्वेक्षण अधिक गतिमान करण्यात आले आहे. 
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फुटबॉल वर्ल्डकपमधून जर्मनी बाहेर पडण्याचं काय कारण आहे?