Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जिल्हा परिषद निवडणुक : नागपुरात भाजपला धक्का

Zilla Parishad Elections
, बुधवार, 8 जानेवारी 2020 (17:52 IST)
राज्यातील प्रमुख जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार धक्का बसला आहे. तर नागपुरात महाविकासआघाडीने बाजी मारत जोरदार मुसंडी मारली आहे. तर नंदुरबारमध्ये काँग्रेस तर धुळ्यात भाजप पुढे आहे. 
 
नागपूरमध्ये गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. तर बावनकुळे यांच्या कोराडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार नाना कंभाले विजयी झालेत. दरम्यान, धुळ्यात भाजपनं मुसंडी मारलीय. आमदार जयकुमार रावल यांच्या मतदार संघात १० पैकी ८ ठिकाणी भाजपनं विजयी आघाडी घेतली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या प्रीपेड योजनांमध्ये मिळणार आहे अमर्यादित कॉल आणि डेटाची सुविधा, किंमत 150 रुपयांपेक्षा ही कमी