Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उत्तम सिंग यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर

उत्तम सिंग यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
, बुधवार, 28 सप्टेंबर 2016 (10:24 IST)
ज्येष्ठ संगीतकार,संगीत संयोजक आणि व्हायोलिन वादक श्री. उत्तम सिंग यांना सन 2016 या वर्षासाठी चा गानसम्राज्ञी श्रीमती लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. मानचिन्ह, मानपत्र रु. 5 लाख रोख तसेच असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
 
श्री.उत्तम सिंग यांच्या नावास सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीतील सर्व सदस्यांनी एकमताने अनुमोदन दिले. या समितीत सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह, श्री.श्रीधर फडके, श्रीमती आशा खाडिलकर, श्री.स्वानंद किरकिरे, अजय व अतुल गोगावले आणि श्रीमती श्रेया घोषाल यांचा समावेश आहे.
 
उत्तम सिंग यांचा जन्म 25 मे 1948 साली झाला. उत्तम सिंग यांचे वडील सतार वादक होते. त्यांनी सात वर्षे  मटका वाद्य, 6 महिने सितार वाद्य व दोन वर्षे गायनाचे शिक्षण घेतले.
 
श्री. उत्तम सिंग 12 वर्षांचे असतानाच त्यांचे वडील त्यांना मुंबईत घेऊन आले.  वयाच्या 12 वर्षापासून त्यांनी तबला व व्हायोलिन याचे शिक्षण घेतले. उत्तम सिंग यांनी तीन वर्षे व्हायोनिलन वादनाचे काम केले. सन 1963 रोजी त्यांना मोठा बेक्र मिळाला.  हिंदी व तामिळ चित्रपंटासाठी कामे केली. राजश्री प्रॉडक्शनचे गाजलेले चित्रपट ' मैने प्यार किया', 'हम आपके है कौन' तसेच विविध तामिळ चित्रपटांसाठी आणि पंजाबी चित्रपटांसाठीही त्यांनी संगीत संयोजक म्हणून काम केले. त्यांनी श्री. मनोज कुमार यांचे पेंटरबाबू व क्लर्क या चित्रपटांनाही संगीत दिले. 1992 साली श्री. जगदीश खन्ना यांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वंतत्रपणे काम सुरू केले. एक संगीतकार म्हणून चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या दिल तो पागल है, दुश्मन, फर्ज, दिल दिवाना होता है या गाजलेल्या  चित्रपटांना संगीत दिले.
 
1996 साली श्री. उत्तम सिंग हयांनी 'ओम साई ओम' व 2002 साली सुर या खाजगी अल्बमला संगीत दिले. तसेच 1997 साली त्यांना 'दिल तो पागल है' या चित्रपटासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला व 2002 साली 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (सर्वोत्कृप्ट संगीत दिग्दर्शक) जाहीर झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सामना कार्टून प्रकरण शिवसेनेत राजीनामा सत्र की स्टंट ?