Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तब्बल २३ वर्षांनंतर 'ऑपेरा हाऊस' खुले होणार

तब्बल २३ वर्षांनंतर 'ऑपेरा हाऊस' खुले होणार
, बुधवार, 19 ऑक्टोबर 2016 (17:06 IST)
मुंबईच्या गिरगावातील ब्रिटीश कालीन ऐतिहासिक थिएटर 'ऑपेरा हाऊस' तब्बल २३ वर्षांनंतर खुले होत आहे. १९९३ मध्ये ८० वर्षांचा वैभवशाली इतिहास असलेले थिएटर बंद करण्यात आले होते. मात्र आता गुरुवारी (२० ऑक्टोबर) मामि फेस्टिव्हलच्या उद्घाटन सोहळ्यावेळी हे थिएटर पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी खुले होत आहे. या ऑपेरा हाऊसच्या बांधणीसाठी वास्तुविशारद आभा लांबा यांच्या नेतृत्वाखाली सहा वास्तुविशारदांच्या पथकाने आठ वर्ष मेहनत घेतली आहे. त्यानंतर या ऐतिहासिक वास्तूला नवे रुप मिळाले आहे. 
कोलकाताचा कलाकार मोराइस बॅन्डमन याने १९०८ साली ऑपेरा हाऊस साकारण्याची कल्पना सुचवली होती. त्यानंतर १९५२ साली रसिकांचे मनोरंजन करण्याच्या उद्देशाने गोंदालचे महाराज विक्रमसिंह यांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवली. पुढे सिंगल स्क्रीन थिएटर चालवणेच कठीण झाल्याने ऑपेरा हाऊस बंद करण्यात आले.   मात्र २०१० मध्ये विक्रमसिंह यांचे पुत्र ज्योतिंद्रसिंह यांनी 'ऑपेरा हाऊस'ची पुनःस्थापना करण्याचे ठरवले. यानंतर पुर्नबांधणीची आखणी करण्यात आली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लक्षाधीशाने दिले मुलीच्या लग्नाचे अनोखे निमंत्रण