Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बसमध्ये पॅनिक बटण, सीसीटीव्ही आणि जीपीएस बंधनकारक: गडकरी

बसमध्ये पॅनिक बटण, सीसीटीव्ही आणि जीपीएस बंधनकारक: गडकरी
नवी दिल्ली- महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी देशभरातील सार्वजनिक परिवहन विभागाच्या बसगाडय़ांमध्ये पॅनिक बटण, सीसीटीव्ही आणि वाहनाचे ठिकाण दर्शवणारे उपकरण या सुविधा बंधनकारक करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
 
येत्या 2 जूनला यासंदर्भातील सूचना जारी करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी दिल्लीत सांगितले. दिल्लीतील निर्भया प्रकरण लक्षात घेता महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटण, सीसीटीव्ही आणि वाहनाचे ठिकाण दर्शवणारे उपकरण या सुविधा सार्वजनिक विभागाच्या बसगाडय़ांमध्ये बंधनकारक करण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले.
 
बसमधील या नव्या सुविधेमुळे महिलांना बसने प्रवास करताना कोणताही धोका जाणवल्यानंतर त्या पॅनिक बटण दाबून जवळच्या पोलीस ठाण्यात कळवू शकतात. पॅनिक बटण दाबल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱयांचे चित्रण नजीकच्या नियंत्रण कक्षात दिसण्यास सुरूवात होईल. तसेच बसने निर्धारित रस्ता सोडून अन्य रस्त्याने जाण्यास सुरूवात केल्यास बसमधील यंत्रणेकडून तात्काळ यासंबंधीची माहिती नियंत्रण कक्षाला कळवली जाईल.
 
आगामी काळात बसगाडय़ांचे उत्पादन करतानाच त्यांच्यामध्ये ही उपकरणे बसवण्यात येतील. या उपकरणांची मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्यास हा खर्च कमी होऊ शकतो, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चर्चेत आहे हे हायप्रोफाइल किन्नर, सीएम दंपतीला बनवले मुलगी जावई