Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्र्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा

मुख्यमंत्र्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
मुंबई , गुरूवार, 4 ऑगस्ट 2016 (09:23 IST)
जुन्या पुलाशेजारी नवा पूल बांधण्यात आला आहे. तरीही जुना पूल वापरात ठेवण्यात आला होता. त्याचा वापर बंद करण्यात आला असता, तर ही दुर्घटना टळली असती, असे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे.
 
मुंबई-गोवा महामार्गावरील पूल कोसळल्यामुळे महाडच्या सावित्री नदीत वाहने वाहून गेल्यानंतर बुधवारी दिवसभर घटनास्थळी बचावकार्य सुरू होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ), तटरक्षक आणि नौदलाच्या जवानांकडून परिसरात शोधमोहीम बुधवारी सकाळी सुरू करण्यात आली. पण अद्यापपर्यंत केवळ दोन मृतदेह बचावपथकाला सापडले असून, अन्य कोणत्याही वाहनाचा शोध लागलेला नाही. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी फडणवीस यांनी बचावकार्याचा आढावा घेतला आणि अधिकार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंद्रकांत पाटलांवर खुनाचा गुन्हा दाखल करा : पवार