Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नागचंद्रेश्वर उज्जैन

Ujjen
, मंगळवार, 6 ऑगस्ट 2024 (07:00 IST)
भारतात हिंदू धर्मामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागांची पूजा करण्याची परंपरा आहे. हिंदू परंपरा मध्ये नागांना देवांचे अलंकार देखील मानले जातात. तसेच अनेक ठिकाणी नागांना देवता म्हणून देखील पूजले जाते. 
 
भारत नागांचे अनेक मंदिर आहे. यामधील एक नागचंद्रेश्वर मंदिर मध्यप्रदेशातील उज्जैन मधील जगप्रसिद्ध महाकाल मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर स्थित आहे. विशेष म्हणजे की हे मंदिर वर्षातून एकदा नागपंचमीच्या दिवशीच उघडते. तसेच अशी मान्यता आहे की, नागराज तक्षक स्वतः या मंदिरात राहतात. तसेच फक्त एक दिवस नागपंचमीच्या दिवशी हे मंदिर भक्तांना दर्शन घेण्यासाठी उघडते. 
 
नागचंद्रेश्वर उज्जैन मंदिर इतिहास-
नागचंद्रेश्वर मंदिरात 11 व्या शतकातील एक अद्भुत प्रतिमा आहे. यामध्ये फणा पसरवलेल्या नागाच्या आसनावर शिवपार्वती बसले आहे. उज्जैनशिवाय जगात अशी प्रतिमा कुठेही नाही. तसेच पूर्ण जगामध्ये हे एकमात्र मंदिर आहे. जिथे भगवान विष्णू यांच्या जागेवर महादेव सर्प आसनावर विराजमान आहे. मंदिरामध्ये स्थापित प्राचीन मूर्ती शिवजी, श्रीगणेश, देवी पार्वतीयांच्या सोबत दशमुखी सर्प आसनावर विराजित आहे. 
 
नागचंद्रेश्वर मंदिर उज्जैन आख्यायिका-  
सर्पराज तक्षक यांनी भगवान शंकरांना मानवण्यासाठी घोर तपश्चर्या केली होती. तपस्याने महादेव प्रसन्न झालेत. व सर्पराज तक्षक यांना अमर होण्याचे वरदान दिले. यानंतर तक्षक राजाने प्रभूंच्या सहवासामध्ये राहणे सुरु केले. पण महाकाल वन मध्ये वास करण्याच्या पूर्व त्यांची ही इच्छा होती की, त्यांच्या एकांतात विघ्न यायला नको. तसेच म्हणून वर्षांपासून ही प्रथा आहे की, फक्त नागपंचमीच्या दिवशी हे मंदिर उघडण्यात येईल. या मंदिराचे दर्शन घेतल्याने व्यक्तीची सर्पदोषातून मुक्ती होते. म्हणून नागपंचमीच्या दिवशी उज्जैनमध्ये या मंदिरात असलेले महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी असते. 
 
तसेच हे मंदिर खूप प्राचीन आहे. परमार राजा भोजने ई.स. 1050 मध्ये यामंदिराचे निर्माण केले होते. यानंतर 1732 मध्ये महाराजा राणोजी सिंधिया यांनी महाकाल मंदीराचा जीर्णोद्धार केला होता. 
 
नाग चंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे नागपंचमीच्या दिवशी उघडता. तसेच नागचंद्रेश्वर मंदिराची पूजा आणि व्यवस्था महानिर्वाण आखाडा संन्यासी व्दारा करण्यात येते.
 
नागचंद्रेश्वर मंदिर उज्जैन जावे कसे-
रस्ता मार्ग- नागचंद्रेश्वर मंदिर उज्जैनला जाण्यासाठी अनेक वाहन उपलब्ध आहे. खाजगी वाहनाने तुम्ही उज्जैनला जाऊ शकतात. 
 
विमान सेवा- इंदूर मध्ये असलेले देवी अहिल्याबाई होळकर विमान तळावरून टॅक्सी करून उज्जैन जाता येते. 
 
रेल्वे मार्ग- उज्जैन मध्ये रेल्वे स्टेशन स्थित आहे. मध्यप्रदेश राजस्थान रेल्वेमार्ग उज्जैनला जोडलेला आहे. तसेच इंदूर स्टेशनवरून उज्जैनला रेल्वे मार्गाने जाता येते.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

श्रावणातील प्रत्येक सोमवारी या वेगवेगळ्या शिव मंत्रांचा जप करा, तुमची इच्छा पूर्ण होईल