आमच्या देशाच्या राष्ट्रगीत याबद्दल काही तथ्ये आपल्याला माहीत असायले हवे-
रवींद्रनाथ टागोर यांनी 1911 मध्ये एक कविता लिहिली होती, ज्याचे 5 पद होते.
या कवितेमधील पहिले पद राष्ट्रगीत म्हणून ओळखले जाते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या गीताचे हिंदी आणि उर्दू भाषांतर केले, ज्याचे अनुवाद कॅप्टन आबिद अली यांनी केले.
जन-गण-मन बंगाली भाषेत लिहिलेले असून यात संस्कृत शब्द सामील आहे.
हे गीत पहिल्यांदा 27 डिसेंबर 1911 रोजी कलकत्ता येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वार्षिक संमेलनात दुसऱ्या दिवशी गायले गेले.
24 जानेवारी 1950 रोजी अधिकृतरीत्या हे गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले गेले.
राष्ट्रगीताचे बोल आणि धून स्वत: रवींद्रनाथ टागोर यांनी आंध्रप्रदेश येथील मदनापल्लीमध्ये तयार केली होती.
बेसेन्ट थियोसोफिकल सोसायटीचे प्रिंसिपल आणि कवी जेम्स एच. कजिन्स यांच्या पत्नी मारगैरेट यांनी राष्ट्रगीताच्या इंग्रजी अनुवादासाठी म्युझिकल नोटेशन्स तयार केले होते.
कायद्यानुसार कोणालाही राष्ट्रगीत गाण्याची सक्ती करता येत नाही.
राष्ट्रगीत गायनाचा वेळ 52 सेकंद इतका आहे.
संक्षिप्त रूप (पहिली आणि अंतिम ओळ) गायनाचा वेळ 20 सेकंद इतका आहे.
राष्ट्रगीताच्या नियमांचे पालन करत नसेल तर अथवा त्याचा अपमान करत असेल तर त्याला Prevention of Insults to National Honour Act, 1971 च्या कलम -3 च्या अंतर्गत कडक शिक्षा होऊ शकते.
भारत सरकारच्या सूचनेनुसार, चित्रपट प्रदर्शन दरम्यान चित्रपटाच्या एखाद्या भागात राष्ट्रगीत वाजवले जात असेल तर उभे राहणे किंवा गाणे आवश्यक आहे.
टागोर यांनी हे गाणे इंग्रजी जॉर्ज पंचमच्या कौतुकाने लिहिले होते असेही म्हटलं जाते. 1939 मध्ये लिहिलेल्या एका पत्रात टागोर यांनी हे नाकारले.
राष्ट्रगीत
जन-गण-मन अधिनायक जय हे,
भारत-भाग्य-विधाता।
पंजाब सिन्धु गुजरात मराठा, द्रावि़ड़ उत्कल बंग।
विन्ध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंग।
तव शुभ नामे जागे,
तव शुभ आशीष मांगे,
गाहे तव जय गाथा ।
जन-गण मंगलदायक जय हे,
भारत-भाग्य-विधाता।
जय हे ! जय हे !! जय हे !!!
जय ! जय ! जय ! जय हे !!