Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

#MeToo च्या जाळ्यात अडकले हे दिग्गज सेलेब्रिटी

#MeToo च्या जाळ्यात अडकले हे दिग्गज सेलेब्रिटी
, बुधवार, 2 जानेवारी 2019 (12:49 IST)
या वर्षी भारतीय अभिनेत्री आणि इतर अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी स्वत: च्या लैंगिक छळाच्या घटना उघड केल्या. या वर्षी #MeToo मोहिमेमुळे कोणत्या अभिनेत्री चर्चेत आल्या आणि कोणते दिग्गज सेलेब्रिटी यामुळे जाळ्यात अडकले जाणून घ्या:
 
1. तनुश्री दत्ता - अभिनेत्री तनुश्री दत्ताने सर्वात आधी #MeToo मोहिमेद्वारे अभिनेता नाना पाटेकरवर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला. या मोहिमेद्वारे तनुश्री दत्ताने 10 वर्ष जुना मुद्दा समोर आणला. तनुश्रीने असे म्हटले आहे की 'हॉर्न ओके' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर तिच्याशी असभ्य वागले होते. तनुश्रीच्या या वक्तव्यानंतर बॉलीवूडमध्ये एक लाटच निर्माण झाली. तिने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीवर देखील आरोप केला. तिनी सांगितले की एका गाण्याचे शूटिंग करताना, चित्रपट निर्मात्याने तिला कपडे काढून नृत्य करायला सांगितलं.  
 
2. सोना महापात्रा - गायिका सोना महापात्राने प्रसिद्ध गायक कैलाश खेरवर गंभीर आरोप केले आहे. तिने सांगितले की एकदा कैलाश खेरने तिच्या मांडीवर देखील हात ठेवला होता. तिने या आधी ट्विट करून एका ज्येष्ठ पत्रकारावर देखील लैंगिक छळ केल्याचा आरोप लावला होता. 
 
3. सलोनी चोप्रा - अभिनेत्री सलोनी चोप्राने चित्रपट निर्माता-दिग्दर्शक साजिद खानवर गंभीर आरोप केले. उंगली चित्रपटाच्या या अभिनेत्रीने तिच्या छातीला स्पर्श करण्याचा आरोप केला. साजिद खानवर अभिनेत्री सिमरन सुरी आणि एक महिला पत्रकाराने देखील आरोप केले आहे. 
 
4. केट शर्मा - टीव्ही अभिनेत्री आणि मॉडेल केट शर्माने बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्माता सुभाष घईवर शोषणाचे आरोप केले आहे. एक अजून स्त्रीने घईवर ड्रग्सच्या आहाराद्वारे बलात्काराचा आरोप केला आहे. 
 
5. संध्या मेनन - पत्रकार संध्या मेनन यांनी आपल्या खात्यासह दोन महिलांची प्रकरणे शेअर केली. त्यात, अभिनेता रजत कपूरवर टेलिफोनच्या मुलाखत दरम्यान अमर्यादित चर्चा केल्याचा आरोप होता. #MeToo मोहिमेमध्ये अभिनेता रजत कपूर यांचे नाव येणे देखील धक्कादायक होते.
 
6. डायेंड्रा सोरेस - प्रसिद्ध मॉडेल आणि टीव्ही रियालिटी शो बिग बॉसची एक्स कॉन्टेस्टंट डायेंड्रा सोरेसने #MeToo मोहिमेत प्रसिद्ध लेखक सुहेल सेठवर लैंगिक छळ केल्याचा आरोप लावला होता. डायेंड्रा सोरेस व्यतिरिक्त #MeToo मोहीम अंतर्गत लेखिका इरा त्रिवेदी आणि चित्रपट निर्माते नताशा राठौर यांनी देखील सुहेल सेठवर लैंगिक छळ काढण्याचा आरोप केला आहे. 
 
7. श्रुती हरिहरन - दक्षिण चित्रपटांची अभिनेत्री ती हरिहरन यांनी या वर्षी लैंगिक छळ करणाऱ्या अभिनेता अर्जुन सर्जावरही आरोप केला आहे. या संदर्भात श्रुती हरिहरन यांनी आपल्या विधानाची नोंद मॅजिस्ट्रेटसमोर केली आहे.  
 
8. प्रियंका बोस - अभिनेत्री प्रियंका बोसने दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक छळ काढण्याचा आरोप केला आहे. 'जॉनी गद्दार' चित्रपटात प्रियंका दिसली होती.
 
9. विंता नंदा - #MeToo मोहीम अंतर्गत फेसबुक पोस्ट वापरून लेखिका आणि निर्माते विंता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर आरोप केला आहे. यानंतर तिने हे देखील सांगितले की तिने आलोक नाथच्या बायको आशुला या घटनेबद्दल सांगितले पण त्यांनी तिची काही मदत केली नाही. 
 
10. कंगना राणावत - कंगना राणावत यांच्यासारखे आजच्या मोठ्या अभिनेत्रीने 'क्वीन' दिग्दर्शक विकास बहलवर आरोप केला. 
 
या व्यतिरिक्त मोदी सरकारमध्ये मंत्री एम. जे. अकबर पत्रकारितेतून राजकारणात आले. त्यांच्या पत्रकारिता करिअर दरम्यान त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या महिलांनी त्यांच्यावर आरोप केले आहे. ज्यानंतर त्यांना मंत्रिपदावरून राजीनामा द्यावा लागला. प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. त्या संदर्भातील व्हाट्स एप चॅटिंगचे स्क्रीनशॉट देखील महिलेने शेअर केले आहे. त्यानंतर चेतन भगत यांनी महिलेची जाहीर माफी मागितली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत भारताच्या रामकुमार रामनाथनचा मार्सेल ग्रनॉलर्सवर सनसनाटी विजय