पाकिस्तानमध्ये या वर्षी गूगल टॉपवर होते कमांडर अभिनंदन आणि सारा अली खान

शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 (16:46 IST)
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आणि बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खान वर्ष 2019 दरम्यान पाकिस्तानात चर्चेत होते. दोघेही या वर्षी पाकिस्तानमध्ये गूगलवर सर्वात अधिक सर्च करण्यात आलेल्या शीर्ष 10 लोकांमध्ये सामील आहे. 
 
भारतीय रिअलिटी शो बिग बॉस- सीझन 13 दुसर्‍या मोस्ट ट्रेंडिंग सर्च राहिले जेव्हाकी टीव्ही शो मोटू पतलू या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. ही यादी शोधलेल्या शब्दांच्या आधारावर तयार केली गेली आहे. जे या वर्षी मागील वर्षीच्या तुलनेत अधिक सर्च केले गेले.
 
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान पाकिस्तानात गूगलवर सर्वात अधिक सर्च होणार्‍या लोकांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. सारा फेंशन सेंस आणि आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 
 
यादीत नवव्या क्रमांकावर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये भारतीय आणि पाकिस्तानी वायू सेना फॉइट दरम्यान पाकिस्तानी सेनेने त्यांना ताब्यात घेतले होते. दोन दिवसानंतर त्यांना वाघा-अटारी माध्यमाने भारतात परत आणले गेले होते.
 
या व्यतिरिक्त कबीर सिंह आणि गली बॉय हे चित्रपट सर्वात अधिक सर्च केलेल्या चित्रपटांच्या यादीत पाचव्या आणि दहाव्या क्रमाकांवर आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख मला दत्तक घेत आहेत, तुम्ही यायचंच': 5 वर्षांच्या मुलाचं मित्रांना आमंत्रण